सिंधुताई सपकाळ (माई) यांची मुलाखत
प्रश्न . माई आयुष्यात इतकं सोसलंय तू, इतक्या अडचणींना सामोरं गेलीयेस तरीही देवावरचा तुझा हा विश्वास अजूनही टिकून कसा ? उत्तर. कोणावरतरी विश्वास ठेवायचाच आहे ना, मग 'कोणावरही' विश्वास ठेवण्यापेक्षा देवावर विश्वास ठेवलेला कधीही बरा. त्याने संकटं आणले म्हणून तर मी मोठी झाली. अरे संकटांना हसत खेळत वेलकम म्हणायचं . मी एक गोष्ट वाचली होती बेटा, एक भक्त देवाला सतत सांगायचा कि तू नेहमी माझ्या सोबत असायला पाहिजे, देव म्हणाला राहील मी तुझ्यासोबत. मग भक्त म्हणाला, 'अरे पण मी कस ओळखायचं, तू माझ्यासोबत आहेस कि नाही ते?' देव त्याला म्हणाला, 'जीवनाच्या वाटेवर चालताना तुला मी तुझ्यासोबत आहे कि नाही याबाबत शंका वाटायला लागली, कि फक्त मागे वळून बघ. तुला नेहमी दोन पावलांऐवजी चार पावलं उमटलेली दिसतील.' ठरलं मग. निघाला भक्त आणि वाटेत संकट आलं त्याच्यावर. त्याने मागे वळून खात्री केली, देव खरंच माझ्याबरोबर आहे कि नाहि. त्याला चार पावलं दिसली, मग तो म्हणाला, 'क्या बात है, भगवान मेरे साथ है'. पुढे गेल्यावर त्याच्यावर एक अजुनहि मोठं संकट आलं. त्यात तो ...